गेली सहा महिने झाले भारतीय शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम आहे आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 इंडिया विक्स 16 च्या पुढे गेलेला आहे परंतु स्टॉक स्पेसिफिक मोमेंट ह्या ऍक्टिव्ह आहेत मार्केटच्या अशा कंडिशन मध्ये आज फोकस मध्ये आलेला एक स्मॉल कॅप स्टॉक ज्याच्याबद्दल आपण आज ह्या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत

सदर कंपनी ही भारतातील एक प्रतिष्ठित बांधकाम कंपनी आहे जी विशेष करून फक्त जल स्त्रोत व्यवस्थापन आणि जलविद्युत प्रकल्प मध्येच कार्यरत आहे.
सदर कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपनीने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे म्हणजेच एम के व्ही डी सी यांच्याकडून १०९०.४५ कोटींच्या सिंचन प्रकल्पासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून मान्यता मिळवली आहे.. ज्याला मार्केटच्या भाषेमध्ये L 1 बिडर म्हणतात…
हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील काळाज गावात म्हणजेच फलटण तालुक्यात नीरा देवघर उजव्या कालव्याच्या मुख्य कालव्याच्या ( किलोमीटर 87 ते किलोमीटर 135 ) पाईपलाईन वितरण नेटवर्कच्या बांधकामाशी संबंधित आहे..
सदर प्रोजेक्टमध्ये ह्या कंपनीचा वाटा 20% आहे म्हणजेच सुमारे 218.09 कोटी
प्रकल्पाचा स्कोप ऑफ वर्क
सदर प्रकल्पाचे काम हे कंपनीला तीन वर्षांमध्ये पूर्ण करायचे आहे ज्यामध्ये पाईपलाईनची चाचणी, विविध व्होल्व, चेंबर आणि आउटलेट चे इंस्टॉलेशन पाईपलाईनचे खोदकाम,इन्स्टॉलेशन आणि पाईपचा पुरवठा या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षासाठी प्रकल्पाचे ऑपरेशन मेंटेनन्स आणि देखरेख हे सर्व कंपनीकडे राहणार आहे
ही आहे कंपनी ज्याचा पीई रेशो त्याच्या इंडस्ट्री पीइ रेशोच्या निम्म्यावर आहे
संबंधित कंपनीचे नाव आहे पटेल इंजिनियरिंग.
NSE वर कंपनीचा सिम्बॉल PATELENGG आहे.
पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे बाजार भांडवल साधारण 3620 कोटी रुपये इतके आहे.
कंपनीचा बाजारभाव हा फक्त 45 रुपयांच्या खाली आहे कंपनीचा प्राईस टू अर्निंग रेशो साधारण 10.5 आहे आणि ह्या इंडस्ट्रीचा प्राईस टू अर्निंग रेशो हा जवळपास 19.7 आहे म्हणजेच सदर कंपनी ही आपल्या इंडस्ट्रीच्या पीई रेशोच्या निम्म्यावर काम करीत आहे सदर प्रोजेक्टच्या घोषणेनंतर कंपनीचा बाजार भाव 45 रुपये 20 पैसे ह्या उच्चांकावर गेला
डिस्कलेमर/ अस्विकरण : हा लेख फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांच्या माहितीच्या उद्देशाने आहे यामध्ये कोणताही गुंतवणूक सल्ला नाही