Motilal Oswal Buy Recommendation
- सध्यस्थितीला भारतीय शेअर बाजार मधे अनिश्चित आणि अस्थिर वातावरण पहायला मिळत आहे त्यामुळे शेअर मार्केट एक्सपर्ट फंडामेंटली स्ट्रॉन्ग आणि किफायतशीर कंपनी मधेच गुंतवनूक करण्याचा सल्ला देत आहेत..
- दरम्यान, भारतीय शेअर मार्केट मधील एक अग्रगन्य ब्रोकरेज कंपनी, मोतीलाल ओसवाल यांच्याकडून दिग्गज JSW ग्रुप च्या JSW ENERGY ह्या कंपनीचे शेयर्स मधे गुंतवनूक करण्याचा सल्ला दिला आहे..
- 1994 मधे स्थापन झालेली JSW ENERGY ही वीज क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेली नामांकित कंपनी आहे.. महाराष्ट्र, कर्नाटका, पंजाब आणि राजस्थान मधे कंपनी वीज निर्मिती आणि वितरण करते..
- JSW Energy ही भारतातील ऊर्जा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे, जी पारंपरीक आणि रिन्यूएबल एनर्जी दोन्ही प्रकारच्या ऊर्जेवर भर देत..

ब्रोकरेज हाऊस कडून मिळालेल्या माहितीनुसार जेएसडब्ल्यू एनर्जी ही छत्तीसगडमधील के एस के महानदी पॉवर कंपनी या कंपनीचे अधिग्रहण करणार आहे .के एम पी सी एल छत्तीसगड मध्ये सध्या 3600 मेगावॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प चालवत आहे
कंपनीची उत्पादने आणि सेवा
JSW Energy Ltd. ही भारतातील अग्रगण्य वीज उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी ऊर्जा उत्पादन, पारेषण आणि व्यापार यामध्ये कार्यरत आहे. तिची प्रमुख उत्पादने आणि सेवा खालीलप्रमाणे आहेत:
1. वीज उत्पादन ( Power Generation ) : JSW ENERGY ही औष्णिक, जलविद्युत आणि रिन्यूएबल एनर्जी स्त्रोतांद्वारे वीज निर्माण करणारी एक महत्त्वाची कंपनी आहे.
1थर्मल ऊर्जा (Thermal Power): कंपनीकडे कोळसा आणि लिग्नाइटवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनांचा वापर करतात.
महाराष्ट्रात रत्नागिरी मध्ये, कर्नाटकात विजयनगर मध्ये आणि राजस्थानमध्ये बाडमेर येथे कंपनीचे थर्मल पावर प्लांट आहेत
जलविद्युत ऊर्जा (Hydropower): हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये जलविद्युत प्रकल्प आहेत.पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा उपयोग करून वीजनिर्मिती केली जाते.
Renewable Energy : JSW Energy वाऱ्यावर आणि सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीमध्ये गुंतवणूक करत आहे.2050 पर्यंत पूर्णपणे कार्बन-न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवून सौर आणि पवन ऊर्जा उत्पादन क्षमता वाढवत आहे.राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे मोठे पवन आणि सौरऊर्जा प्रकल्प आहेत.
2. वीज वितरण आणि व्यापार (Electricity Transmission & Trading ) : कंपनी वीज विविध औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांना वितरित करते.नवीन तंत्रज्ञानाद्वारे वीज पारेषण (Transmission) आणि वितरण (Distribution) अधिक कार्यक्षम बनवले आहे.वीज व्यापार विभागाद्वारे (Power Trading) कंपनी खुल्या बाजारात (Open Access) वीज विकते आणि खरेदी करते.
3. ऊर्जा व्यवस्थापन आणि सल्लागार सेवा (Energy Management & Consultancy) : JSW ENERGY ऊर्जा कार्यक्षमतेसाठी (Energy Efficiency) उपाययोजना पुरवते . औद्योगिक कंपन्यांना ऊर्जा वापर सुधारण्याच्या उपाययोजना सुचवते .हरित ऊर्जा (Green Energy) उपायांसाठी सल्लागार सेवा देते .
4. भविष्यातील उपक्रम आणि योजना (Future Plans): 2030 पर्यंत रिन्यूएबल एनर्जी उत्पादन क्षमता 10 GW पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट.
ऊर्जा संचयन (Energy Storage) आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर भर देणे.इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणे.
किती रुपयांचा टार्गेट आहे?
- आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी JSW ENERGY चा स्टॉक 454.85 वर बंद झाला…
- मागील सहा महिन्यामधे भारतीय मार्केट मधे आलेल्या विक्री मुळे JSW ENERGY शेअर त्याच्या 52 आठवड्याच्या हाय पासून जवळ जवळ 32% खाली आला आहे..
- मोतीलाल ओसवाल यांनी JSW ENERGY मधे दीर्घ कालीन गुंतवनूकीसाठी बाय चा सल्ला दिला आहे.. त्याना ह्या गुंतवनूकी मधून साधारण 60% परतावा अपेक्षित आहे… ह्यासाठी त्यांनी टार्गेट प्राइज 705/- ठरवली आहे..
सदर आर्टिकल हे फक्त माहितीच्या उद्देशाने लिहिण्यात आले आहे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
It’s helpful to buy this share. I Bought 500 shares today.