Bonus Share | समजून घ्या बोनस शेअर्स म्हणजे काय?

By Equity Xpress24

Updated on:

💡 नमस्कार मित्रांनो इक्विटी एक्सप्रेस चा प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बोनस शेअर्स म्हणजे काय याच्यावर माहिती घेणार आहोत.

💡 शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या बऱ्यापैकी प्रत्येकाला बोनस शेअर म्हणजे काय याची माहिती असतेच पण तरीही आज आपण थोडसं डिटेल मध्ये याबद्दल समजून घेणार आहोत..

💡 Bonus Shares | बोनस शेअर ही संकल्पना गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी ही महत्त्वाची असतेच..

💡बोनस शेअर ला आपण एका प्रकारे स्टॉकचा डिव्हिडंड असेही म्हणू शकतो.. सर्वसाधारणपणे डिव्हिडंड हा रोख स्वरूपात म्हणजेच कॅश स्वरूपात आपल्या बँक अकाउंटला दिला जातो परंतु बोनस शेअर्स म्हणजेच स्टॉक डिव्हीडंट हा शेअर्सच्या स्वरूपातच दिला जातो.

परंतु बोनस शेअर्स म्हणजे नेमके काय एखादी कंपनी बोनस शेअर्स का देते याचे गुंतवणूकदारांना काय फायदे आणि तोटे आहेत अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत

Table of Contents

What is Bonus Shares | बोनस शेअर्स म्हणजे काय?

स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट असणारी एखादी कंपनी जेव्हा नफा कमवते आणि तो नफा डिव्हिडंड च्या स्वरूपात गुंतवणूकदारांना न देता ती नफ्याची रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतवते आणि यातून जी रक्कम उभे राहते त्या रकमेचा वापर करून विद्यमान शेअर धारकांना रोख रकमेच्या स्वरूपात न देता शेअर्सच्या स्वरूपात दिली जाते यालाच आपण बोनस शेअर्स असे म्हणतो.

बोनस शेअर्स देताना कोणतीही कंपनी गुंतवणूकदारांना अतिरिक्त शुल्क लावत नाही किंबहुना लावू शकत नाही

बोनस शेअरची प्रक्रिया

  • कंपनी तिच्याकडे असलेल्या संचित नफ्यातून म्हणजेच रिझर्व फंड मधून शेअर कॅपिटल मध्ये रक्कम हस्तांतरित करते
  • विद्यमान शेअर धारकांनी म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे आधीपासून कंपनीचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे जितके शेअर्स आहेत त्या प्रमाणामध्ये कंपनीने डिक्लेअर केलेल्या रेशो प्रमाणे अतिरिक्त शेअर्स मिळतात.
  • बोनस डिक्लेअर झाल्यानंतर शेअर्सची किंमत ही ऑटोमॅटिक पणे अड्जस्ट होते उदाहरणार्थ जर कंपनीने 1:1 ना रेशो मध्ये शेअर्स जाहीर केला असेल तर गुंतवणूकदाराकडे असलेल्या शेअरची रक्कम ही निम्मी होते परंतु त्याच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या ही दुप्पट होते याचाच अर्थ गुंतवणूकदाराची होल्डिंग व्हॅल्यू ही तेवढीच राहते

Bonus Ratio | बोनस शेअरचा रेशो

विद्यमान गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक एका शेअर मागे किती शेअर बोनस द्यायचा ह्याचे प्रमाण हे सर्वस्वी कंपनी ठरवत असते. ते कसे हे आपण समजून घेऊ.

हे गुणोत्तर खालील प्रमाणे असते

बोनस शेअर्स : गुंतवणूकदारांकडे असलेल्या शेअर्सची संख्या

1:1, 3:1, आता हे नेमके काय असतील ते समजून घेऊ

  • 1:1, जर कंपनीने एकास एक बोनस जाहीर केला असेल तर आपल्याकडे असलेल्या एका शेअर मागे एक शेअर आपल्याला एक्स्ट्रा मिळेल म्हणजेच बोनस शेअर.

म्हणजे जर माझ्याकडे एसबीआय कंपनीचे 500 रुपये प्रमाणे 100 शेअर्स असतील तर मला आणखी शंभर शेअर्स एसबीआयचे मिळतील.

या पद्धतीने माझ्याकडे एसबीआय चे 200 शेअर्स होतील परंतु माझ्याकडे असलेल्या शेअर्सची रक्कम हे 250 रुपये होईल म्हणजे माझ्याकडे असलेल्या शेअर्स रक्कम जरी दुप्पट झाली तरीही माझी गुंतवणुकीची रक्कम ही तेवढीच राहील जितकी बोनस मिळण्यापूर्वी होती.

  • 3:1 जर कंपनीने ह्या प्रमाणामध्ये बोनस जाहीर केला असेल तर माझ्याकडे असलेल्या प्रत्येक एका शेअर मागे कंपनी मला तीन शेर बोनस म्हणून देईल.

जर माझ्याकडे एका कंपनीचे 50 शेअर्स असतील तर मला त्या 50 शेअर्स पैकी प्रत्येकी एका शेअर्सवर तीन असे 150 शेअर्स बोनस म्हणून मिळतील म्हणजे माझ्याकडे एकूण 200 शेअर्स होतील.

बोनस शेअर्स मुळे माझी गुंतवणूक वाढते का??

अजिबात नाही!

बोनस शेअर्स मिळाल्यामुळे गुंतवणूकदाराच्या एकूण गुंतवणूक रकमेवर (Investment Value) कोणताही फरक पडत नाही.

होते काय, तर त्याच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या वाढते, पण त्या प्रमाणात शेअरची किंमत (Stock Price) ऍडजस्ट होते. त्यामुळे एकूण गुंतवणुकीची रक्कम (Total Investment Value) जशीच्या तशी राहते

हे कसे होते ?

  • समजा, एखाद्या गुंतवणूकदाराकडे १० शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची किंमत १,००० रुपये आहे.

त्यामुळे त्याची एकूण गुंतवणूक : १० × १,००० = १०,००० रुपये

  • कंपनी १:१ बोनस शेअर्स जाहीर करते, म्हणजेच प्रत्येक विद्यमान शेअरवर एक अतिरिक्त शेअर मिळेल. त्यामुळे त्या गुंतवणूकदाराकडे आता २० शेअर्स होतील.

परंतु, शेअरची किंमत ऍडजस्ट होईल आणि ती अर्धी म्हणजे ५०० रुपये होईल. त्यामुळे एकूण गुंतवणूक अजूनही समानच राहील : २० × ५०० = १०,००० रुपये

म्हणूनच, बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदाराच्या मालकीचे शेअर्स वाढतात, पण त्याच्या एकूण गुंतवणुकीच्या किंमतीत कोणताही बदल होत नाही.

लॉन्ग टर्म चा विचार केला, तर कंपनीच्या वाढीसोबत शेअरची किंमत पुन्हा वाढू शकते आणि त्यामुळे गुंतवणूकदाराला फायदा होतो..

Bonus Share Benefit | बोनस शेअर्सचे गुंतवणूकदारांना होणारे फायदे

  • बोनस शेअर्स हे शेअर गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक संधी आहे. कंपन्या त्यांच्या विद्यमान शेअरधारकांना हे शेअर्स मोफत देतात, ज्यामुळे गुंतवणूकदारामध्ये गुंतवणुकीचे आकर्षण वाढते.
  • बोनस शेअर्स चे गुंतवणूकदाराना मिळणारे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:

मोफत शेअर्स :

बोनस शेअर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, गुंतवणूकदारांना कोणताही अतिरिक्त एक रुपयाही न देता बोनस शेअर्स मिळतात .

उदाहरणार्थ, 1:1 च्या बोनस प्रमाणात, 100 शेअर्स असलेल्या गुंतवणूकदाराला 100 अतिरिक्त शेअर्स मिळतात. यामुळे त्यांची शेअरमधील मालकीची टक्केवारी वाढते.

लॉंग टर्म मध्ये नफ्याची संधी

  • बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांकडे असलेल्या शेअर्सची संख्या वाढते. जर कंपनी भविष्यामध्ये ही चांगल्या प्रकारे काम करत राहिली आणि त्यामुळे जर शेअरची किंमत वाढली तर गुंतवणूकदाराला दीर्घकाळात मोठा नफा मिळू शकतो. .

शेअरची लिक्विडिटी वाढते

  • बोनस शेअर्समुळे मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या शेअर्सची संख्या वाढते. आणि त्यामुळे शेअर्सची खरेदी-विक्री सुलभ होते आणि बाजारातील लिक्विडिटी (रोखता) वाढते.
  • हे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यांना शेअर्सची योग्य किंमत मिळण्याची शक्यता वाढते.

शेअर्सच्या किमतीमध्ये ऍडजस्टमेंट

  • बहुतांशी वेळेला शेअरची किंमत ही जास्त असल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करायला बघत नाहीत अशा परिस्थितीमध्ये बोनस देऊन अशा शेअर्स च्या किमती या स्वस्त केल्या जातात.
  • उदाहरणार्थ, 2000 रुपये किंमतीचा शेअर 1:1 बोनसनंतर 1000 रुपयांवर येतो. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांसाठी शेअर्स खरेदी करणे सोपे जाते आणि बाजारातील सहभाग वाढतो.

Tax Benifit | कर फायदा

  • भारतात, बोनस शेअर्सवर कोणताही **लाभांश कर** (Dividend Distribution Tax) लागत नाही, कारण ते शेअर कॅपिटलमधून जारी केले जातात.
  • परंतु जेव्हा आपण हे शेअर्स विकतो , तेव्हा मात्र **कॅपिटल गेन टॅक्स ** (STCG/LTCG) लागू होतो. म्हणजे जे शेअर्स आपल्याला बोनस म्हणून मिळाले आहे ते जेव्हा आपण विकून त्याच्यावर मात्र आपल्याला टॅक्स भरावा लागतो..

भविष्यातील लाभांशवर (Cash Dividend)वाढीची शक्यता

  • आज कंपनीने दिलेल्या बोनस शेअर्समुळे आपल्याला रोख स्वरूपात कोणता फायदा होत नाही परंतु शेअर्सची संख्या मात्र वाढतील..
  • आता जर कंपनीची भविष्यातील कामगिरी चांगली राहिली आणि कंपनीने रोख स्वरूपात लाभांश म्हणजेच डिविडेंट जाहीर केला तर आपल्याकडे असलेल्या शेअरची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो

मालकी हक्कात वाढ

  • बोनस शेअर्समुळे शेअरधारकाचे कंपनीतील मालकीचे प्रमाण (Ownership Stake) वाढते.
  • याचा अर्थ, कंपनीच्या निर्णयांवर (जसे की बोनस, स्प्लिट, किंवा विलीनीकरण) त्यांचा प्रभाव पडू शकतो.
  • बोनस शेअर्सचा तात्काळ फायदा नसतो, कारण शेअर किंमत ऍडजस्ट होते.
  • हा फायदा दीर्घकाळातच मिळतो जेव्हा शेअर किंमत वाढते.

कंपनीच्या मूलभूत तत्त्वांवर (नफा, व्यवस्थापन, उद्योगातील स्थान) लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

बोनस शेअर्स जारी केल्याने कंपनीला होणारे फायदे

  • बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांना होणारा फायदा आपण बघितला आता बोनस शेअर्समुळे कंपनीला काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊ..
  • बोनस शेअर्स कंपनी आपल्या संचित नफ्यातून जारी करते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणताही अतिरिक्त भार सहन करावा लागत नाही. बोनस शेअर्स केवळ गुंतवणूकदारांसाठीच नव्हे, तर कंपनीसाठीही अनेक फायदे देतात.

कंपनीला बोनस शेअर्स जारी करण्याचे फायदे:

1. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो : जेव्हा एखादी लिस्टेड कंपनी बोनस शेअर्स जाहीर करते, तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये असा मेसेज जातो की कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो आणि कंपनीच्या विश्वासार्हते मध्ये वाढ होते..

2. शेअर्सची लिक्विडिटी वाढते : बोनस शेअर्स जाहीर केल्यामुळे बाजारात पूर्वीपेक्षा अधिक शेअर्स उपलब्ध होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सहभाग ही वाढलेला असतो , आणि त्यामुळेच शेअर्सच्या खरेदी-विक्रीची संधी वाढते आणि त्यांची लिक्विडिटी सुधारते.

3. शेअरची किंमत अफोर्डेबल होते: जर कंपनीचा शेअर ची किंमत जर जास्त महाग असेल तर सर्वसामान्यपणे नवीन गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करताना कचवतात. परंतु बोनस शेअर्समुळे शेअर्सची संख्या वाढते आणि किंमत ऍडजेस्ट होते, त्यामुळे शेअर्सची किंमत अफोर्डेबल झाल्यामुळे अधिक लोक गुंतवणूक करू शकतात.

4. संचित नफा प्रभावीपणे वापरला जातो : काहीवेळा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात संचित नफा असतो, पण काही वेळा कंपनी तो नफा शेअर धारकांना रोख स्वरूपात देऊ इच्छित नसते . अशावेळी बोनस शेअर्स हा एक चांगले पर्याय असतात, कारण यातून नफा भागधारकांमध्ये वाटला जातो. ह्यालाच एक प्रकारे स्टॉक डिव्हिडंड असे आपण म्हणू शकतो

5. भविष्यातील डिव्हिडंड देण्याचा भार कमी होतो : बोनस शेअर्स दिल्यामुळे भागधारकांचे एकूण शेअर्स वाढतात, पण त्याचवेळी प्रत्येक शेअरवरील डिव्हिडंडची रक्कम कमी होते. त्यामुळे कंपनीच्या रोख खर्चात बचत होते.

6. करसंबंधी फायदे (Tax Benefits): बोनस शेअर्स हे शेअरहोल्डर्सना मोफत दिले जात असल्यामुळे यावर तात्काळ कोणताही कर लागत नाही.

7. मार्केटमध्ये सकारात्मक संकेत मिळतात: बोनस शेअर्स जाहीर केल्याने बाजारात कंपनीबद्दल सकारात्मक संदेश जातो. गुंतवणूकदारांना असे वाटते की कंपनी दीर्घकालीन ग्रोथ साठी सक्षम आहे आणि त्यामुळे नवीन गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षिले जातात

बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटमध्ये फेस व्हॅल्यूवरील परिणाम

फेस व्हॅल्यू (Face Value) म्हणजे शेअरची मूळ नाममात्र किंमत, जी कंपनी बुक मध्ये नोंदवलेली असते.

मार्केटमध्ये शेअरची आता काय प्राईज चालू आहे त्याच्याशी फेस व्हॅल्यू चा थेट संबंध नसतो, पण काही महत्त्वाच्या फायनान्शियल गोष्टींसाठी ती महत्त्वाची ठरते.

बोनस शेअर्स आणि फेस व्हॅल्यूवर होणारा परिणाम:

बोनस शेअर्स दिल्यामुळे कंपनीच्या फेस व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल होत नाही.

✅ बोनस शेअर्समध्ये:

  • नवीन शेअर्स विद्यमान गुंतवणूकदारांना मोफत दिले जातात.
  • शेअर्सची संख्या वाढते, पण फेस व्हॅल्यू पूर्वीसारखीच राहते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 असेल आणि 1:1 बोनस शेअर्स दिले गेले, तर बोनस नंतरसुद्धा प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 राहील.

शेअर स्प्लिट आणि फेस व्हॅल्यूवरील परिणाम

शेअर स्प्लिट झाल्या नंतर शेअरची संख्या वाढते परंतु फेस व्हॅल्यू कमी होते.

✅ शेअर स्प्लिटमध्ये:

  • शेअरचे लहान भाग केले जातात, त्यामुळे शेअर्सची संख्या वाढते.
  • शेअरची फेस व्हॅल्यू त्याच्या स्प्लिट प्रमाणात कमी केली जाते.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 असेल आणि त्याने 1:5 स्प्लिट केले, तर प्रत्येक विद्यमान शेअरचे दोन शेअर्स होतील आणि प्रत्येक शेअरची नवीन फेस व्हॅल्यू ₹2 होईल.

मुख्य फरक : बोनस शेअर्स दिल्यास फेस व्हॅल्यू कायम राहते, पण शेअर्सची संख्या वाढते.शेअर स्प्लिट केल्यास फेस व्हॅल्यू कमी होते, पण शेअर्सची संख्या वाढते.दोन्ही प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांचा शेअरहोल्डिंग टक्केवारीत कोणताही बदल होत नाही.

गुंतवणूकदारांनी या दोन्ही संकल्पना समजून घेतल्या, तर ते अधिक चांगले गुंतवणूक निर्णय घेऊ शकतात.

बोनस शेअर्ससंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर्स जाहीर करते, तेव्हा त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे

बोर्ड मीटिंग तारीख (Board Meeting Date) :

ज्या तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये बोनस शेअर्स देण्याचा प्रस्ताव मंजूर केला जातो त्यालाच बोर्ड मीटिंग डेट म्हणतात.

याच दिवशी कंपनी बोनस इश्यूचे प्रमाण (जसे की 1:1, 2:1) जाहीर करते.

रेकॉर्ड तारीख (Record Date)

  • बोनस शेअर्स संदर्भात रेकॉर्ड डेट ही सर्वात महत्त्वाची तारीख असते. कारण हीच तारीख ठरवते कोणत्या शेअर धारकांना बोनस शेअर्स मिळणार आहे की नाही.

कंपनी जी रेकॉर्ड डेट जाहीर करते त्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे शेअर्स कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असतात फक्त त्यांनाच बोनस शेअर्स दिले जातात

एक्स-बोनस तारीख (Ex-Bonus Date):

एक्स-बोनस तारीख म्हणजे शेअर्स बोनसशिवाय (ex-bonus) ट्रेड होण्यास सुरुवात करणारी तारीख. सर्वसामान्यपणे एक्स-बोनस तारीख रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी असते.

बोनस शेअर्स क्रेडिट तारीख (Bonus Share Credit Date):

  • ही ती तारीख असते जेव्हा बोनस शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातात.बोनस शेअर्स मिळण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही.

लिस्टिंग तारीख (Listing Date)

  • बोनस शेअर्स मिळाल्यानंतर ज्या दिवशी ते स्टॉक एक्सचेंज वर ट्रेडिंग साठी उपलब्ध होतात त्याला लिस्टिंग डेट म्हणतात . लिस्टिंग डेट च्या दिवशी गुंतवणूकदार बोनस मिळालेले शेअर्स बाजारात विकू शकतात.

बोनस शेअर्स संदर्भातील तारखा समजून घेतल्याने गुंतवणूकदार योग्य वेळी निर्णय घेऊ शकतात. रेकॉर्ड डेट आणि एक्स-बोनस डेट यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, कारण यावर ठरते की तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार की नाही.

बोनस शेअर्स इशू करणे हे कंपनी आणि गुंतवणूकदार दोघांसाठी फायद्याचे ठरते.

  • हे केवळ शेअर्सच्या किंमतीला ऍडजस्ट करण्यासाठीच नाही, तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि कंपनीच्या आर्थिक स्थैर्यात वाढ करण्यासाठीही उपयुक्त ठरते.
  • त्यामुळे ज्या कंपन्या दीर्घकालीन वाढ साध्य करू इच्छितात, त्या बोनस शेअर्सचा उपयोग प्रभावीपणे करतात.

  • बोनस शेअर्स हे गुंतवणूकदारांसाठी एक सोनेरी संधी असू शकते, विशेषत: जेव्हा कंपनीची वाढ सुरू असते. तथापि, केवळ बोनसवर भर देऊन गुंतवणूक न करता, कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे सखोल विश्लेषण करणे नेहमीच शहाणपणाचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांशी चर्चा करावी.

Leave a Comment